कळमसरेत शॉर्ट सर्किटने संसारोपयोगी साहित्य जळून खाक..

0

अमळनेर / प्रतिनिधि
कळमसरे येथे एका घरात शॉर्टसर्किट मुळे आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज ता.24 रोजी घडली.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील कळमसरे गावातील दुर्गानगर भागात राहणारे घनश्याम रामेश्वर वैराळे यांच्या घरात आज सकाळच्या सुमारास घरातून तसेच छतावरील डगमधून मोठा धूर निघत असल्याचे शेजारच्या रहिवाशांना निदर्शनास आले. आणि एकच धावपळ उडाली. घरमालक घनश्याम वैराळे हे यावेळी शेवटच्या टप्प्यात झोपले होते.यावेळी अनेकांनी त्यास आवाज दिल्याने ते जागे झाले,तोपर्यंत घरात संपूर्ण धूर झाला होता.किचन रूम मधील असलेले फ्रीज पूर्णतः कोळसा झालेले दिसून आले.गावातील तरुणांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत घरमालक यांना सुखरूप बाहेर काढीत,घरातील वीजपुरवठा खंडित करून पेट घेतलेले फ्रीज देखील बाहेर काढले.मात्र धूर ओसरल्यावर जे दिसले ते धक्कादायक होते.ते म्हणजे घरातील संसारोपयोगी साहित्य देखिल जळून खाक झाले होते.यामध्ये फ्रीज सह घरातील फॅन विद्युत प्रवाह बोर्ड भांडी,डबे,त्यातील कडधान्य , धान्य कपडे संसार उपयोगी वस्तू आदींचा यात समावेश आहे.
दरम्यान या घटनेत त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मोलमजुरी करणारे हे कुटुंबं या घटनेमुळे हताश झाले आहे. हा शॉर्ट सर्किट झाल्याने घनश्याम वैराळे व त्यांची आई शोभाबाई वैराळे यांचे अश्रू अनावर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!