इथून पुढे माझेच ऐका-अजित पवार..
मी साठाव्या वर्षी भूमिका घेतली, तुम्ही ३८ व्या वर्षीच वसंतदादांना मागे सारले..

24 प्राईम न्यूज 25 Dec 2023 मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली म्हणून मला बोल लावता, पण काहींनी वयाच्या ३८ व्या वर्षीच वसंतदादांना मागे सारले, अशा खोचक शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतच घरचा आहेर दिला. रविवारी बारामतीमध्ये अजितदादा गटाच्या कार्यकत्यांचा मेळावा झाला. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्या राजकारणाचे वाभाडे काढले.
आता पर्यंत वरिष्ठांचे खूप ऐकले इथून पुढे तुम्ही माझेच ऐका. बाकी कुणाचेही ऐकू नका, असा सल्ला अजितदादांनी भाषणा दरम्यान कार्यकत्यांना दिला.आपण नेहमीच सांगत आलो आहे. काळ बदलत असतो. एक वर्षभरापासून याभूमिकेबाबत आपण चर्चा करीत होतो. मात्र, कुणी समजून घ्यायला तयारच नव्हते. त्यामुळे मी माझी भूमिका घेतली. माझा निर्णय योग्य होता. म्हणूनच पक्षातील एवढे लोक माझ्यासोबत आले. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांना काय मी दमदाटी केली काय?, हे सर्व माझ्यासोबतआले. सत्तेचा फायदा जनतेच्या विकासासाठी करून घेण्याची ही भूमिका होती. आजूबाजूच्या तालुक्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती काय आहे जरा बघा, असेही अजित पवार म्हणाले.