अमळनेर येथे जळगांव जिल्हा स्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा ..

0

अमळनेर/ प्रतिनिधि

Consumer Protection in the era of e-Marketing and Digital Trade”

गंगाराम सखाराम भांडारकर हायस्कूल मधील IMA सभागृहात शासन स्तरावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त तहसीलदार श्री.उपासनी यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जळगांव जिल्हाध्यक्ष मा.श्री.दादासाहेब हेमंत भांडारकर यांनी भूषविले,कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन आणि पू.साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.महिला कार्यकर्त्यांनी ग्राहक गीत सादर केले.श्री.दादासाहेब हेमंत भांडारकर यांनी आपल्या भाषणात ई कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट मधील फायदे आणि या व्यवहारातील फसवणूक व ग्राहकांनी घ्यायची काळजी आणि ग्राहकांना उपलब्ध कायदेशीर संरक्षण यावर विस्तृत व माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे पदाधिकारी अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा.श्री.रवींद्र जी माळी ॲड.कुंदन साळुंखे, ॲड.विवेक लाठी, डॉ.रामराव पाटील,पत्रकार श्री. उमेश जी धनराळे,श्री.दीपक भोई,श्री.संतोष पाटील,श्री.सुरेश पाटील,प्रा.श्री.सुभाष माळी, ग्राहक संरक्षण परिषद जळगांव अशासकीय सदस्य श्री.नरेंद्र जी पाटील,श्री.महेंद्र जी बोरसे जिल्ह्यातील इतर संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमळनेर तहसील कार्यालय व पुरवठा विभागाचे अधिकारी मा. श्री.संतोष बावणे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड(आयुष्मान कार्ड) कसे काढावे याबद्दल शिधा वाटप दुकानदार आणि उपस्थित ग्राहक यांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गोसावी आणि सहकारी यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर केले.ग्राहकांना घरगुती गॅस वापरा बद्दल घ्यायची काळजी अपघात कसा टाळावा याचे प्रात्यक्षिक गॅस वितरक यांनी केले. सूत्र संचालन सौ.नयना महाजन यांनी केले आभारप्रदर्शन सौ.घोंगडे बाईंनी केले.पुरवठा निरीक्षक श्री.पाटील,कर्मचारी श्री.वानखेडे,श्री.नागो पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!