राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद भाई जहागिरदार यांनी स्वखर्चाने धुळे शहरातील वाल्मीक आंबेडकर वसाहत तिखी रोड मोहाडी धुळे येथे पाण्याची टाकी व बोअरवेल सुविधा मोफत उपलब्ध

धुळे /अनीस खाटीक
अजित दादा पवार यांच्या सामाजिक बांधीलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद भाई जहागिरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील वाल्मीक आंबेडकर वसाहत तिखी रोड मोहाडी धुळे येथे पाण्याची टाकी व बोअरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली. या बोअरवेलचे उद्घाटन धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार, शशी भाऊ खैरनार ,धुळे शहर महिला जया ताई साळुंखे, संजय तात्या जगताप ,ज्ञानेश्वर माळी, ज्ञानेश्वर पाटील, समीर खान, पीर मोहम्मद शहा, एजाज शेख, रियाज भाई गांधी, मनोज शिरसाट, अजय साळवे, आदित्य काकडे, भरत शिंदे, पुष्पा भदाणे, वंदना वाकडे, मेघा बागुल, वंदना शिंदे, व पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.