अमळनेर तालुक्याला कापूस या पिकाचा पिक विमा मिळून दिल्याबद्दल शिरसाळे ग्रामस्थांकडून सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न..

अमळनेर/प्रतिनिधि
तालुक्यातील शिरसाळे येथे अमळनेर तालुक्याला कापूस या पिकाचा पिक विमा मिळून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पिक विमा मिळून देण्यासाठी सतत झटणारे अमळनेर तालुक्यातील किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील व इतर मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच युवराज पाटील हे होते तालुक्याचे खरे शेतकऱ्यांचे कैवारी किसान काँग्रेसचे कार्यध्यक्ष प्रा. सुभाष पाटील व त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, डॉ. अनिल शिंदे, धनगर पाटील, मयूर पाटील, गिरीश पाटील, बाजार समिती संचालक नितीन पाटील,विकासो चेअरमन दिनेश पाटील ग्राप सदस्य उपस्थित होते.वावडे येथे पोलिस पाटील दत्ता ठाकरे ,लोण येथे पोलीस पतील व पिंपळे येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाम चौधरी यांनी केले