वडिलांच्या आधी आता आईचं नाव…
– राज्यात चौथ्या महिला धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी..

0

24 प्राईम न्यूज 26 Dec 2023 संपूर्ण नाव घेताना, स्वतःचे नाव… नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव घेतले जाते. पण आता हा नियम बदलला जाणार आहे. कारण वडिलांच्या आधी आता आईचे नाव लावावे लागणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने चौथे महिला धोरण आणले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान दिली.

राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार आहे. राज्यात चौथे महिला धोरण आणून महिलांचा सन्मान केला जाणार असून वडिलांच्या नावाआधी आता आईचे नाव लावले जाईल, असे अजित पवार म्हणाले. “महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!