ते माझे बंड नव्हतेच. थांबा म्हटले तरी थांबले नाहीत.. -शरद पवार

24 प्राईम न्यूज 26 Dec 2023 ते आमचे बंड नव्हतेच, तर आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला होता. त्याबद्दल कुणीही तक्रार केली नव्हती. आताही कुणाला तक्रार कैरायची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली ? ? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. त्यांना थांबा म्हटले तरी थांबले नाहीत. आता नव्या लोकांना प्रोत्साहन द्यायची काळजी मी घेतली याचाच मला आनंद आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. पुण्यातील भीमथड़ी जत्रेला शरद पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दिला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता प्रत्येकाचा जो-तो अधिकार आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीचा तो अधिकार आहे. त्यांचे उमेदवार निवडायचे बदलायचे, काय करायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर भाष्य करण्याचे काही कारण नाही, असेही शरद पवार म्हणाले.