महेमीलखान यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार..

.
फयाजोद्दीन शेख/ एरंडोल प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील हाजी एन एम सय्यद,उर्दू हायस्कूल चे उपशिक्षक मेहमिलखान सर यांना महाराष्ट्र टीचर असोसिएशन तर्फे धुळे येथे रिद्धी सिद्धी हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला. या कार्यक्रमास शिवसेना नेते संजय राऊत, खासदार विनायक राऊत, मा. आमदार कुणाल जी पाटील, आमशा दादा पाडवी, शुभांगी ताई पाटील उपस्थित होते.शैक्षणिक ,सामाजिक पर्यावरण, तसेच सामाजिक कार्यात इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांना हा मान मिळाला आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे