अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तरुणाचा त्रिवनिषेध व सखोल चौकशीची मागणी…

0

जळगांव (प्रतिनिधी)जळगाव शहरात एका अल्पवयीन मुलासोबत एका अल्पसंख्यांक समाजाच्या तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी सदर तरुणाला अटक सुद्धा केलेली आहे. याप्रकरणी जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची एक तातडीची सभा नुकतीच पार पडली असून त्यात इस्लाम धर्माच्या पवित्र कुराणातील “सूर ए अलआरफ आयात क्रमांक ८१ व ८२ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की” *असे कृत्य तुम्ही पुरुषासोबत करूच शकत नाही* समलैंगिक संबंधास पूर्णपणे विरोध केलेला असून त्याची अत्यंत कठोर शिक्षा प्रस्तावित केलेली आहे त्यानुसार या अल्पसंख्यांक समाजा च्या तरुणाने बालकासोबत केलेल्या नैसर्गिक कृत्याचा निषेध करून त्या तरुणाची सखोल चौकशी करण्यात यावी व ३० दिवसाच्या आत दोषारोपण पत्र दाखल करून जलद न्यायालयात हे प्रकरण चालवून आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारची पुनरावृत्ती कोणीही करणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे.
*त्याच सोबत समलैंगिक व लिव्ह अँड रिलेशनशिप हे कायदे भारत सरकारने त्वरित रद्द करावे अशी सुद्धा मागणी करण्यात आली.*
या आशयाचे तक्रार- निवेदन ऑन लाइन मा मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,विशेष पोलिस महा निरीक्षक, नाशिक, जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत.

*सभेत यांचा होता समावेश*
मनसे अध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मझहर पठाण, महाराष्ट्र युवक काँग्रेस सहसचिव मुक्तदीर देशमुख, मानियार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रीय मुस्लिम क्रांती जिल्हाध्यक्ष डॉक्टर शाकीर खान, नगरसेवक रियाज बागवान, एमपीजे अध्यक्ष आरिफ देशमुख, इदगाह ट्रस्ट सहसचिव अनिस शाह, पटेल बिरादरीचे युवा अध्यक्ष मतीन पटेल, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे फहीम पटेल, आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!