वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित,अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड.. ———————– पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन..

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन..
जळगाव(प्रतिनिधी) जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषद करीता या वर्षी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे अभ्यासू युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून ते आज रात्री उशिरा मुंबई येथून दावोस कडे रवाना होणार आहे. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
या वर्षीची परीषद 15 जानेवारीपासून पाच दिवस सुरू राहणार आहे. या परिषदेत भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावणार असून ते 17 जानेवारीला संध्याकाळी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान संबोधन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त या परिषदेला जगभरातील इतर नेतेही उपस्थिती लावणार आहेत. या वर्षीच्या परिषदेचा विषय हा ‘जागतिक परिस्थिती’ असा आहे.भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे.
काय आहे दावोस परिषद?
दावोस हे स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठावर वसलेलं सुंदर खेडं आहे. हे गाव स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरागांनी वेढलेलं आहे. या गावाची लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे ठिकाण आहे.
दावोसमध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती आपली उपस्थिती लावतात. दरवर्षी या बैठकीत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जीनेव्हामध्ये आहे. या संस्थेच्या माध्यमातून जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि जागतिक विकासाला चालना देण्यासंबंधी धोरण निश्चित करतात. पाच दिवस चालणाऱ्या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्ती सहभाग घेतात.
उच्च शिक्षित,अभ्यासू,युवा खासदार उन्मेश दादा पाटील यांची सार्थ निवड
खासदार उन्मेशदादा पाटील राज्यातील सर्वाधिक युवा खासदार तसेच अभ्यासू खासदार म्हणून ओळखले जातात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी महाराष्ट्रातून युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड झाली असून त्यांच्यासोबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व खासदार हेमंत पाटील हे देखील या परिषदेसाठी सहभागी होणार आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव खासदार उन्मेशदादा पाटील हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी होणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.