३० हजारांची लाच घेताना पोलिस व त्यांच्या पंटर वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

अमळनेर/प्रतिनिधि. पोलीस हवालदार ब.नं. ३६४ घनशाम अशोक पवार, अमळनेर पोलीस स्टेशन यांनी तकारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम
पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण यांचे हस्ते स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल.

तक्रारदार यांचा अमळनेर परिसरात बांधकाम मटेरियल वाहतुकीचा व्यवसाय असुन ते त्यांच्या मालकीच्या डंपरने बांधकाम मटेरियल वाहतुक करीत असतांना अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार घनशाम अशोक पवार यांनी दिनांक ०७.०१.२०२४ रोजी त्यांचे डंपर अडवुन तकारदार यांना तेथे बोलावुन त्यांचेकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्याकरीता व स्वतः करीता दरमहा हप्ता म्हणुन ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीवर माहिती दिली होती.
सदर माहितीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पथकांने अमळनेर येथे येवुन तकारदार यांची तकार घेतली होती. सदर तकारीची दि. ०९.०१.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पोलीस हवालदार घनशाम अशोक पवार यांनी तकारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन दिनांक १०.०१.२०२४ रोजी सदर लाचेची रक्कम पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण यांचे हस्ते स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द अमळनेर पो.स्टे. जि. जळगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.