शिरसमणी येथील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – शिरसमणी (ता.पारोळा) येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच,सदस्य,मा.सरपंच व ग्रामस्थांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.मतदारसंघात सुरू केलेली विकासगंगा,सभोवतालील गावांचा सर्वांगिण विकास ही दुरदृष्टी पाहता आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज सरपंच विजय भास्कर पाटील, उपसरपंच भिमराव नरसिंग वंजारी,ग्रामपंचायत सदस्य शिवम पवार,दादाभाऊ पाटील,सुभाष वंजारी,गोरख भिल,स्वप्निल बोरसे,संभाजी भावराव पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, दळवेल सरपंच प्रविण पाटील, शेतकी संघाचे मा.सदस्य दासभाऊ पाटील,चेतन पाटील, भोंडण दिगर मा.सरपंच भैय्यासाहेब पाटील,आडगांव सरपंच महेश मोरे,म्हसवे मा. उपसरपंच साहेबराव पाटील, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.