यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल धुळे संचलित इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर काॅलेज आॅफ सायन्स धुळेच्या
विद्यार्थिनींच्या उंच भरारी

धुळे/अनिस खाटीक. 8 ऑक्टोबर 2023 रोजी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या जिल्हा स्तरावर गांधी कथा परिक्षा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये इस्लाहुल -बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळेच्या विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला आणि त्यात प्रथम पारितोषिक मेहरीन रिदा अझीम अहमद आणि द्वितीय पारितोषिक अन्सारी सारा जमील अहमद यांना मिळाले. दोन्ही विद्यार्थी सातवीत आहेत. 9 जानेवारी 2024 रोजी पांडू बापू माळी मनपा शाळा शिरपूर येथे या विद्यार्थिनींचे प्रमाणपत्र व मिडल आणि शाळेला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या अवसर वर संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणीव सदस्य यांनी , शाळेचे मुख्याध्यापक श्री शमसुल हसन सर व इतर शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थीनिला व मार्गदर्शक शिक्षिका आमेना मेडम, शबीना मॅडम, शाहीन मॅडम यांना शुभेच्छा देऊन गौरविण्यात आला.