सारबेटे बु. व खु. येथे मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण..

अमळनेर/ प्रतिनिधि. सारबेटे बु. व खु. येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावतीने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांचा हस्ते पार पडला. या प्रसंगी कामगार नेते एल.टी. नाना पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांच्या सह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
सारबेटा बु येथील मा.सरपंच रज्जब खान, ग्रा.पं. सदस्य हारून भैय्या मेवाती, मा.सरपंच कदामद खान, मा.उपसरपंच असलम खान, अमजद खान, हाशिर दादा, मोमिन सर, मुब्बशीर, शाहरुख, उबेद, शाकिर, फरीद, जावेद, रिज़वान, सद्दाम, फिरोज, आसिब, जमील, जुबेर, आफताब, टूग्गु, सलमान, इरफ़ान, समीर, फिरोज, आसिब, सोएब, मोहसिन यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
तर सारबेटा खु.येथे उपसरपंच कोमल राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शितल समाधान पाटील, ज्ञानेश्वर नथू पाटील, अक्षय बंजारा, हिरालाल बंजारा, युवराज पाटील, मधुकर पाटील, किशोर पाटील, विकास पाटील, शरद पाटील, शिवाजी पाटील, भानुदास पाटील, भगवान पाटील, धर्मेंद्र पाटील, वसंत मिस्तरी, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, रामकृष्ण पाटील, दिनेश पाटील, सागर पाटील, सिद्धार्थ बनसोडे, विशाल ब्रम्हे, विजय ब्रम्हे उपस्थित होते.
सारबेटा बु येथील विकास कामे
जि.प.अंतर्गत उर्दू शाळेच्या ३ खोल्या बांधणे ३६ लाख या कामाचे भूमिपूजन तर डी.पी.डी.सी अंतर्गत मराठी शाळा संरक्षण भिंत बांधणे १० लाख, आमदार निधी अंतर्गत सभामंडप बांधणे १५ लाख, जलजिवान मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना निर्माण करणे ९२ लाख, ०४ अंतर्गत पूल बांधकाम करणे १५० लाख या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
सारबेटे खु. येथील विकास कामे २५१५ अंतर्गत शेत रस्ता खडीकरण करणे २० लाख, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत रस्ता काँक्रिट करणे १० लाख या कामांचे भूमीपूजन तर आमदार निधी सण २०२०-२१ अंतर्गत सारबेटे खु. ते सारबेटा खु फाटा खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, आमदार निधी सण २०२१-२२ अंतर्गत सारबेटे खु ते फाटा खडीकरण व डांबरीकरण करणे २५ लाख, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत रस्ता व गटार बांधकाम करणे ८ लाख या कामांचे लोकार्पण करण्यात आले.