पोलीसांच्या मध्यस्तीनंतर जक्का जाम आंदोलन अखेर मागे..

रईस शेख/दोंडाईचा प्रतिनिधि
दोंडाईचा नवीन प्रस्तावित ‘हिट अॅण्ड रन’ कायदा आणि भारतीय न्याय संहितेविरोधात आज ट्रक चालकांनी जक्काजाम

आंदोलन पुकारले होते. त्यासाठी आज सकाळी १0.३० वाजेच्या सुमारास मोठ्या संख्येने ट्रक चालक, मालक नंदुरबार चौफुलीवर जमले. मात्र, तिथे पोहोचलेल्या ए पी आय विलास ताटीकोंडलवार यांनी आंदोलकांची यशस्वी समजूत काढल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.
केंद्र सरकारने हिट ॲण्ड रन कायदा आणल्याने चालकांसह मालकांचे मोठे नुकसान होणार आहे. नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये देखील कठोर तरतूदी असल्याचे म्हणत ट्रक चालकांनी आंदोलनाचे पाऊल उचलले होते. ही माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी आणि दोंडाईचा ठाणे तथा पी एस आय शरद लेंडे फौजफाट्यासह तेथे पोहोचले. यावेळी ताटीकोंडलवार यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच त्यांच्याकडे असलेली माहिती खोडून काढली. अद्याप कुठलाही नवीन कायदा लागू झालेला नाही. अपघात घडल्यानंतर जुन्या कायद्यानुसारच कारवाई होत असल्याचे पटवून सांगितले. तसेच आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल; असेही आंदोलकांना बजावण्यात आले. यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. आजच्या आंदोलनात वाहतूक चालक-मालक संघटना अशोक मराठे,खंडु पाटील, नाटु आप्पा,भुऱ्या भाई, सदाम शेख, सिकंदर शेख,राजा शेख, बापु पाटील,
साबीर शेख, आदी सहभागी झाले होते.