आता राष्ट्रवादीत व्हीपवरुन वाद…
छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे खळबळ…

24 प्राईम न्यूज 12 Jan 2023. शिवसेना ठाकरे आणि शिदि गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालानंतर शिंदे गटाने बजावलेला व्हीप ठाकरे गटाला लागू होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. असेच प्रकरण राष्ट्रवादीतही असून, त्याचा निकाल ३१ जानेवारीला द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीच्या निकालाआधीच व्हीपवरून वादविवाद रंगल्याचे दिसून येत आहे. अशातच मंत्री भुजबळांनी केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही गटात खळवळ उडाली आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचानिकाल देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिद गटाचे मुख्य भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. तर मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेले कीप के राहुल नार्वेकर यांनी बेकायदा ठरवले आहेत. हाच मुद्दा हेरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील मंत्री छगन भुजवळ यांनी कीप आमचाच आहे, असे वक्तव्य केले आहे.खरा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निकाल ३१ जानेवारी रोजी अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. तेव्हा हा निकाल कोणाच्या बाजुने लागतो, हे पाहावे लागणार आहे. २ जुलै २०१३ रोजी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले असून, पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात पार पडली आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निकाल राखीव ठेवला असून, अशातच सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी राष्ट्रवादीबाबत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत