ओबीसी नेत्यांची आज बैठक झुंडशाहीने कायदे बदलता येत नाहीत – भुजबळ

24 प्राईम न्यूज 28 Jan 2023
मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला, असे म्हटले जात असले तरी मला तसे वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाहीत. आम्ही सुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेऊ, अशी शपथ सर्व मंत्रिमंडळाने घेतली आहे. मात्र, ओबीसींना गाफील ठेवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला जात आहे, याचा सर्वांनाच विचार करावा लागेल. असे सांगत १६ फेब्रुवारीपर्यंत ओबीसींसह सर्व समाज बांधवांनी या आरक्षणाच्या विषयावर आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. दरम्यान, ओबीसींच्या संघर्षाची दिशा ठरवण्यासाठी रविवार, दि. २८ जानेवारी रोजी सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.