तर १०० टक्के चॅलेंज देणार-जरांगे पाटील..

24 प्राईम न्यूज 1 फेब्रु.2023
अधिसूचनेविरोधात ओबीसी होयकोर्टात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या सुधारीत अधिसूचविरोधात ओबीसी मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी वेलफेअर फाऊंडेशनतर्फे अॅड. मंगेश ससाणे यांनी बुधवारी याचिका दाखल केली आहे.मंडल आयोगाला खरंच चॅलेंज करेन – मनोज जरांगे
माझी त्यांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कुणबी नोंदी सापडल्या म्हणून प्रमाणपत्रे घेतली आहेत. मागच्या दारातून आरक्षण घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हीसुद्धा पुराव्यानिशी बोलत आहोत. आता कुणी कुठेही गेले तरी मराठ्यांचे आरक्षण जाणार नाही. पुढच्या १५ दिवसांत अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार आहे. ओबीसी समाजाने त्यांना समजावून सांगावे की, राजकीय स्वार्थापोटी गोरगरीब पोरांचे वाटोळे करू नका, अन्यथा मी १०० टक्के मंडल आयोगाला चॅलेंज करेन. त्यातून ओबीसींमधील गोरगरिबांचे नुकसान होईल, पण आम्हाला कुणाचे नुकसान करून मोठे व्हायचे नाही. मंडल आयोगाचा अहवाल अजून स्वीकारण्यात आलेला नाही. लवकरच मी वकिलांची बैठक घेणार आहे, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिले आहे.