राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे फैजपुर शहराध्यक्ष अनवर खाटीक यांना समाज रत्न पुरस्काराने सम्मानित..

रावेर/प्रतिनिधी. रविवार रोजी कर्जोद ता रावेर येथे मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे फैजपुर शहराध्यक्ष अनवर खाटीक यांना समाज रत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले सर्व सामान्य कुटुंबातील अनवर खाटीक यांनी राजकारणात व समाज कारण या मध्ये आपली स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली सर्वाशी आपुलकीने व प्रेमाची भावणा ठेवुन नि स्वार्थ पणे काम करणारे व्यक्ति म्हणुन त्यांची ओळख आहे करोना काळात अनेक पेशंट ला स्वताची काळजी न करता निस्वार्थ पणे लोकांना मदत करणारे सामान्य लोकांन विषयी समस्या निवारण करणे साठी विविध आंदोलना मध्ये सहभागी होऊन लोकांना नाय हक्क मिळवुन देण्यासाठी लढाणारी व्यक्ति म्हणुन आज त्यांना समाज रत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले अनवर खाटीक यांना सम्मानित करतांना रावेर यावल मतदारसघांचे आमदार आदरणीय माःश्री शिरीष दादा चौधरी रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद साहेब कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील सरपंच नंदु दादा महाजन कुर्षी उत्पन्न बाजार समिति सदस्य असगर दादा सैय्यद नगरसेवक सादिक भाई नगरसेवक मुतल्लीब खान गयासुद्दीन काजी साहेब रावेर तालुका शिक्षक नेते जाकीर सर संस्थेचे चेअरमन शेख शकील भाई तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते