संत तुकारांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार‌‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिक झाले भावविभोर.

0

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय दिवशीही गर्दीचा उच्चांक. अमळनेर /प्रतिनिधी97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता सादर झालेल्या ‌‘जाऊ देवाचिया गावा’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्याने रसिकगण भावविभोर झालेत. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर झालेले हे महानाट्य पाहण्यासाठी रसिकांनी गर्दीचा उच्चांक मोडला. सभागृह रसिकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. साडे सातला सुरू झालेले महानाट्य रात्री सव्वाबारापर्यंत चालले.

चार तासापर्यंत सभागृह होते हाऊसफुल्ल
सायंकाळी साडेसातला महानाट्यास सुरवात झाली. महानाट्य चार तास चालले. नाटकाचा समारोप होईपर्यंत सभागृह हाऊसफुल्ल होते. जवळपास चार हजार प्रेक्ष्ाकांनी हे नाटक प्रत्यक्ष्ा पाहिले. तर या नाटकाचे थेट प्रसारण ‌‘97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर’ या यू ट्यूब चॅनलवरून दाखवण्यात येत होते. त्यावरूनही अनेक नागरिकांनी घरी बसून या महानाट्याचा लाभ घेतला.

असे आहेत महानाट्यातील कलावंत
या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले असून त्यांनी संत तुकारामाची भूमिकाही साकारली आहे. या महानाट्यात 150 कलावंतांनी ीग घेतला आहे, तर 70 कलावंतांनी आपल्या नृत्यकौंशल्यातून डोळ्याचे पारणे फेडले आहे. या महानाट्याची निमिर्ती डॉ.जर्नादन चितोडे अध्यक्ष्ा वृंदावन चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे यांनी केली आहे. या महानाट्यात बैलगाड्या, पालख्या, घोडे यांच्या सहभागाने या महानाट्यात जिवंतपणा आणला होता. या म हानाट्यास अशोक पत्की यांनी संगीत दिलेले आहे. यात 12 गाणी दाखवण्यात आली आहेत. मयूर वैद्य यांनी कोरीओग्राफी केली आहे. तर सतीश काळे यांनी गीते लिहीली आहेत. सुरेश वाडकर, आनंद भाटे, देवकी पंडित, रवींद्र साठे यांनी गायली आहेत.

म्मबाजीचे गाण्याला मिळाली दाद
या महानाट्यात आगळ्या वेगळ्या पध्दतीने सादर करण्यात आलेले व त्यागराज खाडीलकरांनी गायलेले म्मबाजी हे गीत दाद घेऊन गेले.

सभामंडपात गुंजला जय हरी विठ्ठलचा गजर
महानाट्यात संत तुकाराम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठलाचे नामस्मरण करण्याचा प्रसंग दाखवण्यात येत होता. त्या प्रसंगानुसार सभागृहातील रसिक श्रोतेही ‌‘जय हरी विठ्ठल’च्या नामस्मरणाचा गजर केला.

सदेह वैकुठागमनाने डोळ्यात आणले पाणी
महानाट्याचा समारोप संत तुकाराम यांचा सदेह वैकुठागमनाने करण्यात आला आहे. या प्रसंगाने अनेकांच्या डोळ्यात पाणी तराळले.

आणि असा झाला अमळनेरला प्रयोग
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा प्रयोग अमळनेरच्या खान्देश शिक्ष्ाण मंडळाचे बजरंग अग्रवाल यांनी पुणे येथे पाहिला होता. संतश्रेष्ठ तुकाराम महारांजावरील या महानाट्याने बजरंग अग्रवाल यांच्या मनावर चांगलेच गारूड केले आणि त्यांनी ठरविले की, या महानाट्याचा एक प्रयोग आपल्या अमळनेकरांसाठी करावा. योगायोगाने 97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन प्रताप महाविद्यालयात होत असल्याने त्यात हे नाटक सादर करण्याचे त्यांनी निश्चित केले आणि त्यानुसार संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी रविवार, 4 फेब्रुवारीस ते सादर करण्यात आले. यासाठी खान्देश शिक्ष्ाण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!