पारोळा शेतकरी संघावर आमदार पाटलांचे वर्चस्व ; सर्व १५ जागांवर एक हाती सत्ता

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – येथील शेतकरी सहकारी संघाचे २०२३-२४ ते २०२८-२९ निवडणूकीसाठी रविवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली.यात आमदार चिमणराव पाटील यांनी शेतकी संघावर आपले वर्चस्व कायम ठेवत त्यांचा जय सहकार पॅनल ला १५ जागांवर एकतर्फी दणदणीत विजय मिळाला आहे.
पारोळा येथील शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार चिमणराव पाटील यांचे जय सहकार पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस,ठाकरे गट व भाजप या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी सहकारी बचाव पॅनल उभारला होता.मात्र या शेतकरी सहकारी बचाव पॅनल ला एकही जागा न मिळू देता आमदार चिमणराव पाटलांच्या जय सहकार पॅनल ने त्यांचा पराभव करून एकतर्फी दणदणीत विजय मिळवला,या एकतर्फी विजयानंतर शहरात मिरवणूक काढून आमदार चिमणराव पाटील व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला.
सोसायटी मतदार संघ
सुधाकर पाटील ७०,डॉ.निलेश पाटील ६६,साहेबराव पाटील ६५, भैय्यासाहेब पाटील ६४,चतुर पाटील ६०,सुधाकर वसंत पाटील ५९
कोट…..
विजयी उमेदवार
व्यक्तिशः सभासद मतदारसंघ
दीपक खरे ३३१०,जितेंद्र गिरासे ३२२९,प्रकाश पाटील ३१२६, सचिन पाटील ३०४५
इतर मागासवर्ग मतदार संघ
विजय नेरपगार ३५२९, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ प्रमोद जाधव ३७१६,महिला राखीव मतदार संघ गंगुबाई पाटील ३५९९,माधुरी पाटील ३५७०,विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ संघ राहुल चव्हाण ३५८९