दिल्लीच्या तख्तावर भगवे वादळ आदळणार-उद्धव ठाकरे

24 प्राईम न्यूज 7 फेब्रु 2024. महाराष्ट्र आणि देशावर आलेल्या दुसऱ्या संकटात माझे कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर फिरून पाहत आहे. काही वर्षांत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग आणि तोक्ते ही दोन चक्रीवादळे आपटली होती, पण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात फिरताना चार दिवसात एक वेगळेच वातावरण दिसले होते. हे भगवे वादळ होते आणि ते आता दिल्लीच्या तख्तावर आदळून हुकूमशाहीची चिरफाड करणार आहे, असा विश्वास शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.