पक्षाचा बाप आमच्यासोबत – रोहित पवार..

24 प्राईम न्यूज 7 फेबु 2024
“केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीर गट व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. पण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणे, मुंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणे, असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करून सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत. यातच त्यांची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावले असले तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे,” असे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सांगितले.