चौथीपर्यंतच्या शाळेची घंटा सकाळी ९ नंतर वाजणार.

24 प्राईम न्यूज 9 फेब्रु 2024. राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना वेळापत्रकातील हा बदल लागू असणार आहे. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. राज्यातील अनेक शाळा पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकचे वर्ग सकाळी ७ वाजता भरवतात. शाळेसाठी लहान मुलांना सकाळी लवकर उठावे लागत असल्याने त्याचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतची मुले लहान असतात. त्यांना अनेक ठिकाणी सकाळी • वाजता शाळेत पोचावे लागते. लवकर उठावे लागत असल्याने मुलांना याचा स होतो, त्यामुळे या मुलांच्या जयंची वेळ बदला, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी बज्ञो दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याची दखल घेत अभ्यास केला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून हा अभ्यास करण्यात आला. त्या अभियाना नोंदविण्यातील लिंक देण्यात आली होतो. शिक्षणतज्ज्ञ, पालक, मनातल अधिकारी यांनी देखील आपली शिफारस नोंदविली होती..