ओम चैतन्य नवनाथ दरबारातर्फे धर्मबीज सोहळा..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळ शहरातील उंदिरखेडा रोडालगत मंदिरावर ओम चैतन्य नवनाथ दरबारातर्फे धर्मबीज सोहळा कार्यक्रम दि ११ रोजी रविवारी आयोजित करण्यात आला आहे,कार्यक्रमात सकाळी ४ वाजता नाथांच्या अभिषेक, सकाळी ८ वाजता होम हवन पूजा,सकाळी १० वाजता नाथांच्या नैवेद्य तद्नंतर नवनाथ महाआरती व नवनाथ भोजन आणि त्यानंतर महाप्रसादाचे (भोजन) सुरू करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाच्या भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नाथभक्त सुरेशचंद्र महाराज यांनी केले आहे.