पोलीस पथकाचे अनेक ठिकाणी दारू अड्ड्यांवर धाडसत्र..

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर पोलिसांच्या पाच ते सहा पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे ५० हजार रुपये किमतीची पाच हजार लिटर दारू नष्ट करून हातभट्टया उध्वस्त केल्या.
पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, मधुकर पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, दीपक माळी,नम्रता जरे, मोनिका पाटील, मिलिंद बोरसे आदी पोलिसांनी बहादरपूर रोड, पैलाड भागातील कंजरवाडा, भिल्ल वस्ती, देवगाव देवळी, रामेश्वर आदी ठिकाणी गावठी दारूच्या हटभट्टीनवर धाडी टाकून दारू बनवण्याचे साहित्य, प्लस्टिक इम यांची तोडफोड करून दारू बनवण्याचे रसायन, ५० हजार रुपये किमतीची गावठी दारू नष्ट केली. पोलिसांच्या धाडी सुरू होताच अनेकांनी एकमेकांना कळवल्याने काही आरोपीनी पळ काढला.