ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम- -देवेंद्र फडणवीस

24 प्राईम न्यूज 11 फेब्रु 2024
Niउद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्याबाबत मी ‘गेट वेल सून’ एवढीच प्रतिक्रिया देईन, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझे ठाम मत झाले आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. राज्यात गेल्या काही काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या त्या निश्चितच गंभीर आहेत, पण या सर्व घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या आहेत. त्यामुळे याचा थेट कायदा-सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य आहे. या गुन्हेगारी घटना आपापसातील हेवेदावे, भांडणांमुळे घडल्या. या प्रकरणांमध्ये योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावरील हल्ला प्रकरणात सत्ताधारी पक्षातील महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, विजय वडेट्टीवार यांना फार काही माहिती नसते. ते काहीही बोलत असतात. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची चौकशी होईल, पण अलीकडच्या काळात जे गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी वडेट्टीवारांना दिला.