महाराष्ट्राचा गृहमंत्री मनोरुग्ण-उद्धव ठाकरे

24 प्राईम न्यूज 11 फेब्रूं 2024
महाराष्ट्राला एक मनोलण गृहमंत्री लाभला आहे, असे विधान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते म्हणालेकी, फडणवीस यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला असला तरी संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. हा निर्वावलेला, निर्घृण मनाचा आणि अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. यापूर्वी मी त्यांना फडतूस, कलंक असे बोललो होतो, परंतु आता माझ्याकडे शब्द नाहीत. फडतूस, कलंक हे शब्द फारच सौम्य झाले, पण आता असे वाटते यांची मानसिक तपासणी करावी की काय ? कारण महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे. एका युवा नेत्याची हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर कशी काय करता ? दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलवता हे जनतेला समजले आहेच, पण राज्यात गुंडगिरी करा, खूनखराबा झाला तरी घाबरू नका, पण भाजपमध्ये आलात तर सर्वविसरून जाऊ ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी असल्याचे दिसते, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.