निवडणूक आयोग एका पक्षाचा गुला झालाय; संजय राऊत यांची टीका..

24 प्राईम न्यूज 11 फेबू 2024. भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या नावातून आता भारतीय हा शब्द काढून टाकला पाहिजे. ते आता भारतीय नाही राहिले. तर ते आता एका पक्षाचे, एका व्यक्तीचे गुलाम झाले आहेत. त्यांच्या गळय़ात एका पार्टीचा पट्टा आहे. जर असेच चालत राहिले तर ना हा देश राहील ना लोकशाही राहील, अशी टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष अजित पवार गटाला देण्याच्या केंरीय निर्णयावर मोठय़ा प्रमाणात टीका होत आहे. याबाबत संसदेबाहेर बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली शरद पवार असोत वा उद्धव ठाकरे, ज्यांनी पक्ष बनवला ते तुमच्यासमोर उभे आहेत तरी तुम्ही पक्ष ऐरयागैऱयाला देताय हा कोणता खेळ खेळताय? निवडणूक आयोगाने पक्ष कुणाला दिला त्याचा अर्थ पक्ष त्यांचा झाला असे नाही जनता जो ठरवेल त्याचाच पक्ष राहणार. आता निवडणुका घ्या, बघा हे निवडणूक आयोग कसे कचऱयासारखे उडून जाईल, असे ते म्हणाले.