सानेगुरुजीच्या बालविकास मंदिराचे स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न..

0

अंमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सानेगुरुजी पूर्वप्रार्थमिक बालविकास मंदिराचे स्नेह सम्मेलन येथील भव्य अशा शिवाजी महाराज नाट्यगृहात दि.७ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडले. बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली महाजनांसह सर्व शिक्षीकांनी महीनाभरा पासून लहान लहान बालकांची विविध गाणी बसवली व त्यांची रंगीत तालीम सुध्दा करून घेतली. त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन सदरील संमेलन यशस्वी करून दाखविले‌.
एवढेच न करता बालकांसह महिला पालकांकरीता खेळाचे देखील आयोजन करून स्वतः मुख्याध्यापिका व सर्व शिक्षीकांनी मिळुन ग्रामीण भागातील पहाट कशी उगविते ?, गावातील बायकांची लगबग कशी सुरु असते ?, सकाळच्या प्रहरी वासुदेवाची मंजुळ गाणी अगदी हुबेहूब सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्वात शेवटी सर्व महिलांनी नाचगाण्याचा मनसोक्त आनंद लुटला व कार्यक्रमाची सांगता झाली.
संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी योगिता चौधरी व प्रेमलता पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदिप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर, संचालक मंडळाचे सदस्य काका देशमुख, पत्रकार किरण पाटील, मगन पाटील, सानेगुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे देखील उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!