साने गुरुजी विद्या मंदिरात बाल आनंद मेळावा उत्साहात, विद्यार्थ्यांनी घेतला खरेदी विक्रीचा अनुभव..

0

अंमळनेर/ प्रतिनिधी

अमळनेर शहरातील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत शनिवारी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत बाल आनंद मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उदघाटन संस्थेचे संचालक किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक गुणवंतराव पाटील, भास्करराव बोरसे, यशवंतराव देशमुख, केंद्र प्रमुख किरण शिसोदे, मुख्याध्यापक संजीव पाटील, शिक्षक प्रतिनिधी मुरलीधर मगरे, अनिल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक बांधव विद्यार्थी आणि पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विपणन कौशल्य विकसित व्हावं यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाल आनंद मेळाव्यात शाळेतील 70 विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी यातून खरेदी विक्रीचे कौशल्य आत्मसात केल्याचे दिसून आले. बाल आनंद मेळाव्याचा विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे आनंद लुटला. यावेळी संस्थेचे उपस्थित संचालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले. सूत्रसंचालन मनोहर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!