अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे लोकमान्य शाळेत विद्यार्थ्यांकरिता ग्राहक जनजागृती व फायर सेफ्टी कार्यशाळा संपन्न..

0

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे लोकमान्य शिक्षण मंडळाद्वारे संचलित शाळेत ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ग्राहक जनजागृती व फायर सेफ्टी बाबत कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीताने करण्यात आली.सदर कार्यक्रमात जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख श्री विजय शुक्ला यांनी प्रास्ताविक मांडले व ग्राहकाची अगदी सोप्या भाषेत व्याख्या त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. जिल्हा सह संघटक मकसूद बोहरी यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार यांच्या बद्दल सविस्तर विवेचन केले. ग्राहकांचे सहा हक्क म्हणजे त्याला सुरक्षिततेच्या हक्क आहे, माहिती मिळवण्याचा हक्क, वस्तू निवड करण्याचे हक्क ,आपले तक्रार मांडण्याच्या हक्क, तक्रारीची निरसन करून घेण्याच्या आणि ग्राहकाला शिक्षणाचे अधिकार आहे.ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या एडवोकेट भारती अग्रवाल यांनी सुधारित नवीन ग्राहक संरक्षण कायदा विषयी सन २०२० चे योग्य असे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना विशद केले. प्रत्येक वस्तूचे बिल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष सौ स्मिता चंद्रात्रे व ग्राहक पंचायतीचे सतीश देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक चळवळी विषयी योग्य असे मार्गदर्शन केले. या कार्य शाळेत विद्यार्थ्यांनी अतिशय हिरिरीने भाग घेतला व त्यांना विचारण्यात आलेले प्रश्नांचे समर्पक अशी उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायती कडून रोख बक्षीस वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दिशा गॅस एजन्सी चे व्यवस्थापक श्री दिनेश भाई रेजा यांनी घरगुती गॅस घरी आल्यावर त्यावरील एक्सपायरी डेट व सील उघडून पाणी टाकून ते त्यात वर बुडबुडे तर येत नाहीत ते पहावे पाण्याचे बुडबुडे जरी येत असेल ते लिकेज आहे.त्याची डिलिव्हरी घेऊ नये . दुसरे सिलेंडर घ्यावे. तसेच सील तुटलेले सिलेंडर घेऊ नये व सिलेंडर चे वजन करून त्यावरील एक्सपायरी दिनांक पहावी. कमीत कमी गॅस कसा वापरता येईल याची उपयुक्त अशी माहिती दिली. घरात होणाऱ्या संभाव्य दुर्घटने प्रसंगी तत्काळ न घाबरता कशी गॅस विझवावी त्याचे प्रात्यक्षिक करून त्यांनी दाखवले.

याप्रसंगी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस श्री विवेकानंद भांडारकर, मुख्याध्यापक मनोहर महाजन, जेके चौधरी सर, मार्कंडे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वरिष्ठ व ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीमती विमल मैराळे, खदिर सादिक, जेष्ठ लेखक कवी पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर, निकम सर व दिस गॅस एजन्सी चे इंगळे व सहकारी आणि शिक्षक वृंद, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!