अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवस विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर संपन्न…

शिबिराचे उद्घाटन करतांना माजी माजी सैनिक आसाराम पंडित पाटील प्रा. डॉ.ए. बी.जैन प्रताप महाविद्यालय अमळनेर आदी मान्यवर. अंमळनेर/प्रतिनिधी
चिमनपुरी पिंपळे येथील प्रताप महाविद्यालयाचे अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवस विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे येथील माजी सैनिक आसाराम पंडित पाटील व प्रा. डॉ.ए. बी.जैन
यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून
खा. शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे,
कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संचालक प्राध्यापक डॉ. सचिन नांद्रे, दत्त संस्था चिमनपुरी पिंपळे चे अध्यक्ष निंबा दला चौधरी, महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच शोभाबाई गोकुळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज डी पाटील,
विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना कवयित्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव डॉक्टर दिनेश पाटील,
सिनेट सदस्य कवयित्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्राध्यापक डॉ संदीप बी नेरकर प्राचार्य डॉ रवींद्र सोनवणे,उपप्राचार्य डॉ विजय मांटे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ हेमंत पवार, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा भाग्यश्री जाधव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ सुनील राजपूत हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप महाविद्यालय प्राचार्य प्रा डॉ ए बी जैन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री जाधव मॅडम यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित गोकुळ चुडामन पाटील, संतोष बापू चौधरी , भगवान शंकर पाटील,रामकृष्ण साहेबराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने आठवडाभर दिवसभर भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून सकाळ सत्रात – स्वच्छतेचा जागर, व्यायाम केला जाईल आभार प्रदर्शन प्रा सुनिल राजपूत यांनी केले