ईडीच्या कारवाया फक्त विरोधकांवर… -शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप.

24 प्राईम न्यूज 12 फेब्रु 2024
ईडीच्या कारवाया फक्त विरोधकांवर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी केला. पुण्यात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. केंद्र सरकारकडून फक्त विरोधी पक्षातीलच नेत्यांवर कारवाई केली जाते म्हणतच ईडीच्या कारवाईची आकडेवारीच जाहीर केली. ते म्हणाले की, भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. अगोदर लोकांना ईडी काय आहे, हे माहिती नव्हते. भाजप सत्तेत आल्यानंतर ८ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांतील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांचा समावेश आहे, याचा काय अर्थ काढायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.