बोरीवली – नंदुरबार एक्स्प्रेसला धरणगांव पासून सुरू करावे.. -आवास संस्था तर्फे पश्चिम रेल्वेचे जी एम यांना निवेदन..


अंमळनेर/प्रतिनिधी. बोरीवली – नंदुरबार एक्स्प्रेसला धरणगांव पासून सुरू करावेआवास स्था तर्फे पश्चिम रेल्वेचे जी एम यांना निवेदन अमळनेर येथील सेवाभावी आवास बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने रेल्वे बाबतीत लेखी निवेदन देण्यात आले अमळनेर रेल्वे स्थानकावर दिनांक १३ फरवरी रोजी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अशोक कुमार मिश्रा आले होते यावेळी आवास बहुउद्देशीय संस्था तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गाडी क्रमांक ( १९४२४/२६ ) बोरीवली नंदुरबार एक्स्प्रेस ही गाडी दररोज असते आणि नंदुरबार स्थानकावर पांच तास थांबते म्हणून सदरील गाडी धरणगांव पासून सुरू करण्यात यावी जेणेकरून धरणगांव अमळनेर नरडाणा शिंदखेडा दोंडाईचा या भागातील नागरिकांना मुंबई जाणे सोपे होईल तसेच गाडी क्रमांक ( ०९०७७/७८ ) भुसावळ नंदुरबार स्पेशल एक्स्प्रेस या गाडीला उधना/सुरत पर्यन्त करण्यात यावे कारण नंदुरबार पर्यंत कमी संख्येने प्रवासी प्रवास करतात यामध्ये स्लीपर कोच ही खाली असतात म्हणून सदरील गाडी उधना पर्यन्त करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आवास बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख, रेल्वे यात्री मंचाचे अध्यक्ष डॉ इम्रान अली शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते देविदास देसले, इंजिनियर इम्रान कुरेशी, रतीलाल चव्हाण उपस्थित होते..