गावोगावी रास्ता रोकोचा एल्गार ! -२४ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा मनोज जरांगे यांचा इशारा.

24 प्राईम न्यूज 22 Feb 2024. राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा मंगळवारी केली. परंतु मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी लड़ा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्र आरक्षणाला विरोध केला असून, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करत पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
सरकारने २ दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावांत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचे आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.