परीक्षा केंद्रावर गटविकास अधिकारीच्या फिरत्या पथकाने दिल्या भेटी

अंमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर बारावीच्या पाचही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. एकही कॉपी केस झाली नसल्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सांगितले, बारावीला पाच परीक्षा केंद्रांवर ३ हजार ६६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ५८ विद्यार्थी गैरहजर असल्याने ३ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी परीक्षा दिली. मारवड, अमळगाव, प्रताप महाविद्यालय, जय योगेश्वर महाविद्यालय, एन. टी. मुंदडा हायस्कूल या पाच केंद्रांवर परीक्षा झाली. प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे पाच बैठे पथक नेमण्यात आले होते. तसेच गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या फिरत्या पथकानेदेखील केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षेसाठी दोन पोलिस अधिकारी, २० पोलिस कर्मचारी, ४० पुरुष होमगार्ड, ११ महिला होमगार्ड बंदोबस्ताला होते.
पोलिस निरीक्षक विकास देवरे, सहा. पोलिस निरीक्षक अजित साळवे, शरद पाटील, रवींद्र पाटील, मिलिंद बोरसे या पथकाने केंद्रांना भेटी दिल्या.