मांडळ येथे गावठी बॉम्बच्या स्फोटांमुळे ग्रामस्थां मध्ये भीतीचे वातावरण.. -रानडुकरांसाठी बॉम्ब लावल्याचा संशय..

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे रानडुकरांसाठी ठेवलेले गावठी बॉम्ब आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती, चरबीच्या वासाने गोळे तोंडात घेऊन त्यांना चावण्याचा प्रयत्न केला असता गोळ्याचा स्फोट होऊन दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.
मांडळ गावाबाहेर वावडे रस्त्यालगत मोकळ्या जागेवर २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. बधा कोळी यांचे टॅक्टर जात असताना ट्रॅक्टरखाली बॉम्ब आल्याने त्याचा स्फोट होऊन जाळ झाला, कानठळ्या बसवणारा आवाज झाला.
सुरुवातीला काय झाले हेच कोणाला कळेना, काही वेळानंतर एक कुत्रा त्याठिकाणी आल्यावर त्याने पडलेला बॉम्ब खाण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याच्या तोंडातच स्फोट झाला. त्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला.
काही अंतरावर दुसऱ्या कुत्र्याचाही अशाच पद्धतीने मृत्यु झाल्याचेआढळून आले. पुन्हा आवाज झाला आणि त्या बॉम्बमधून गॅस बाहेर आल्याने बॉम्ब असल्याचा संशय येऊन ग्रामस्थ घाबरले.
आणखी काही बॉम्ब पडलेले पाहून ग्रामस्थ जवळ जायला घाबरत होते सुरेश ठेलारी याने धाडस करून एका गोळ्यावर काठी मारण्याचा प्रयत्न केल्यावर पुन्हा एका बॉम्बचा स्फोट झाला. एकूण दहा बॉम्ब असावेत, त्यापैकी तीन फुटले होते.
ग्रामस्थांनी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना कळविले. डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहा. पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, हे.कॉ. भरत ईशी, फिरोज बागवान, धनंजय न देसले यांनी घटनास्थळी भेट ते. दिली.