जरांगेंच्या आंदोलना मागे शरद पवार.. – जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंचा दावा..

24 प्राईम न्यूज 23 Feb 2024
जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंचा दावा
एकीकडे मनोज जरा ग पाटील’सगेसोयरे’च्या अंमलबजावणीवरून मराठा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत असताना त्याच्या आंदोलनातच उभी फूट पडली आहे. बुधवारी जरांगेंचे विश्वासू जोडीदार कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंच्या गुप्त भेटीवरून गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काही तासांतच मराठा आंदोलनातील जरांगे-पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनीदेखील मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार असल्याचा गौप्यस्फोट गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. आता संगीता वानखेडे यांनी केलेल्या आरोपांना जरांगे नेमके काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोलही केले, परंतु मला सत्य समजल्यावर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून मी जरांगेंचा विरोध करत आहे. आंदोलनात जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. असा आरोपही वानखेडे यांनी केला.