मुंबईत भारत सरकारचे युवा मंत्रालय आयोजित स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम!

0

अंमळनेर/ प्रतिनिधी

प्रख्यात अभिनेते खलनायक रणजित व मान्यवरांच्या हस्ते स्वीकारले बक्षीस!!

भारत सरकारचे युवा मंत्रालय व नेहरू युवा केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे पदव्युत्तर राज्यशास्त्र विषयातील विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
अत्यन्त महत्वाची मानली जाणाऱ्या या राज्यस्तरीय हिंदी व इंग्रजी माध्यमासाठीच्या वक्तृत्व स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत निर्भय धनंजय सोनार यांनी प्रथम क्रमांकाचे रुपये एक लाख रकमेचे पारितोषिक जिंकले !
‘ मेरा विकसित भारत – व्हिजन @२०४७ !’
हा निर्भय सोनार यांच्या मांडणीचा विषय होता .. या विषयावर हिंदी भाषेत निर्भय धनंजय सोनार यांनी प्रभावी मांडणी करून रसिक व परीक्षकांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र व गोवा येथून अगणित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. चषक, मानपत्र व एक लाख रुपये देऊन त्यांना गौरविण्यात आले.

प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ.ए बी जैन डॉ.विजय तुंटे, डॉ.एस.बी.नेरकर, ऍड.सारांश सोनार, डिगंबर महाले, यांनी निर्भयला मार्गदर्शन केले. डॉ.जे.बी.पटवर्धन, डॉ.धीरज वैष्णव, डॉ.कुबेर कुमावत, डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.तुषार रजाळे, डॉ.आर.सी.सरवदे, डॉ.अमित पाटील, प्रा.नितीन पाटील, डॉ.माधव भुसनर, डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.विजय साळुंखे, डॉ.रमेश माने, डॉ.विलास गावीत, प्रा.जयेश साळवे, क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील, डॉ.कैलास निळे, प्रा.सुनील राजपूत, डॉ.राखी घरटे, डॉ.प्रदीप पवार, प्रा.दिलीप तडवी, प्रा.नितीन पोपट पाटील, डॉ.जी एम पाटील, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, सचिन खंडारे, प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा एस ओ माळी, दिलीप सोनवणे, इंद्रवदन सोनवणे पत्रकार बांधव व सुवर्णकार समाजाने निर्भय सोनार यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!