रायगडावरून शरद पवार फुंकणार ‘तुतारी’

24 प्राईम न्यूज 24 Feb 202

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला आता तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह बहाल झाल्याने शरद पवार गट सक्रिय झाला आहे. या पक्षचिन्हाचे थेट किल्ले रायगडावरून अनावरण करण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने शरद पवार गट थेट किल्ले रायगडावरून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.