आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी कुणाची ? . -मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगेंना नोटीस

24 प्राईम न्यूज 24 Feb 2024

राज्य सरकारने आधीच मराठ्यांना १० टक्के आरक्षण लागू केलेआहे. त्यानंतरही मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन करणे योग्य नाही. या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न उपस्थित करीत मुंबई उच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगेंना नोटीस बजावली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी जरागे यांच्या आंदोलनासह त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर युक्तिवाद झाला. यावेळी जरांगेंवर होत असलेले आरोप त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे जरांगेंचे आंदोलन सध्या शांततेतच सुरू आहे