प्रवासात हरवलेला मोबाईल केला परत, रेल्वे पोलिसांची कामगिरी..


अमळनेर/प्रतिनिधि मोबाईल विसरून जाणाऱ्या यवतमाळ येथील प्रवाशास रेल्वे पोलिसांच्या मदतीने मोबाईल परत मिळाला आहे.
यवतमाळ येथील दादाजी सखारामजी आम्रेन्ददास (वय ७५) यांनी अमळनेर रेल्वे स्टेशनवर मोबाईल चार्जिंगला लावला. मात्र मोबाइलचा विसर पडल्याने ते बाथरूमला निघून गेले. त्यादरम्यान रेल्वे पोलीस पोकॉ पवार हे स्टेशनवर गस्त घालत असताना त्यांना बेवारस मोबाईल आढळून आला. त्यांनी मोबाईल रेल्वे पोलीस चौकीस आणला. त्यानंतर प्रवासी हे मोबाईलची चौकशी करण्यासाठी चौकीला आले. पोलीस नाईक हेमंत ठाकूर यांनी तो मोबाईल त्यांचाच असल्याची खात्री करून मोबाईल ताब्यात दिला. मोबाईल सुखरूप मिळाल्याने प्रवासी दादाजी यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले
