अमळनेरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू. -वाहतुकीची कोंडी सोडवण्यात प्रशासनाला यश..

अंमळनेर/प्रतिनिधी.अमळनेर नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अमळनेर बसस्थानकासमोरील धुळे-चोपडा रस्त्यावरील १२ अतिक्रमणे व सिंधी बाजारातील सहा अतिक्रमणे काढल्याने काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी सोडवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

धुळे-चोपडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, हातगाड्या, अवैध प्रवासी वाहने यांच्यामुळे निम्मे रस्ते व्यापले जात होते. वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांना तसेच नागरिकांना त्रास होत होता.
मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्यासोबत संयुक्त कारवाई करत जेसीबी मशीनने बसस्थानकासमोरील दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पत्र्याचे शेड, टपऱ्या आदी १२ अतिक्रमणे काढून टाकली.
तिरंगा चौकात राष्ट्रीय स्मारकाला देखील विक्रेत्यांनी वेढा टाकला आहे. पाचपावली मंदिराजवळ किरकोळ विक्रेत्यांनी फूटपाथवर आपला व्यवसाय सुरू केला आहे. पैलाड भागातून पुलापासून तर अण्णा भाऊ साठे चौकापर्यंत विक्रेते रस्त्यात व्यवसाय करू लागल्याने ग्राहकांच्या दुचाकी रस्त्यावर उभ्या राहतातशहरातील मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्ते याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण विभागाला आदेश देण्यात आले आहेत. –व्यावसायिकांनी स्वतःहून सहकार्य करावे, यानंतर अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करून कारवाई केली जाईल. -तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद.