विधेयक ६४च्या विरोधात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी संघटनेचे २६ रोजी काम बंद आंदोलन.

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या विधेयक ६४च्या विरोधात अमळनेर कषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता तसेच कर्मचारी संघटनेने २६ रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

शासनाने २०२४ विधेयक ६४नुसार अधिनियमात सुधारणा करून बाहेर बाजार उभारून शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येणार आहे. बाजार समितीला फक्त समिती आवारातच खरेदी करण्याचे बंधन येणार आहे. यामुळे बाहेरची कोणीही व्यक्ती माल खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला तसेच पैशाला सुरक्षा नसेल. बाजार समितीचे नियंत्रण नसेल. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.