१ जुलैपासून नवे फौजदारी कायदेकेंद्र सरकारकडून अधिसूचना जारी.


24 प्राईम न्यूज 25 Feb 2024. भारतीय न्याय प्रक्रियेतआमूलाग्र बदल घडवणारे तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू होणार आहेत, अशी घोषणा केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून केली. त्यामुळे भारतीय दंड संहितेची जागा भारतीय न्याय संहिता, फौजदारी प्रक्रिया कायद्याची (सीआरपीसी) जागा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम घेणार आहेत. नवीन कायदे लागू झाल्यानंतर त्यातील नियम व कलमांमध्ये बदल होतील. हत्येसाठी ३०२ ऐवजी १०१ कलम, फसवणुकीसाठी ४०२ ऐवजी ३१६, खुनाच्या प्रयत्नासाठी लावले जाणारे ३०७ कलम आता १०९, तर बलात्कारासाठी ३७६ ऐवजी ६३ कलम लावले जाईल. हिट अॅण्ड रन प्रकरणात नवीन नियम तत्काळ लागू केले जाणार नाहीत.