रायगडावरून तुतारीचा हुंकार !निवडणुकीचे रणशिंग फुंकले, शरद पवारांच्या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण..

24 प्राईम न्यूज 25 Feb 2024
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणि पक्षचे चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांना मिळाले. त्यामुळे शरद पवार गटाची गोची झाली. परंतु शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावाने पक्षाला मान्यता दिली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही मिळाले. या चिन्हाचे अनावरण आज रायगडावर करण्यात आले. या निमित्ताने शरद पवार यांनी बेट रायगडावरून आगामी लोकसभा निवडणुकीचा हुंकार भरला. या निमित्ताने शरद पवार गटाने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शरद पवार यांनी तुतारी हे पक्षचिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यावेळी बहुतांश आमदार हे अजित पवार गटासोबत गेले आणि शरद पवार यांच्यासोबत मोजकेच आमदार राहिले. तसेच लोकसभेचे राज्यातील ४ आणि लक्षद्वीपचे एक यापैकी ४ खासदार शरद पवार यांच्याकडे राहिले आणि १ खासदार अजित पवार गटा सोबत गेला. याशिवाय विधान परिषदेचे बरेच आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाची अडचण झाली. मात्र,शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवणाऱ्यांची संख्या बरीच आहे. त्यातच पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूनेच लागला. त्यामुळे पक्ष आणि चिन्हह्यविना शरद पवार गट भाजपआणि अजित पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेत राहिला. त्यातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला मान्यता दिली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर तुतारीवाजविणारा माणूस हे पक्षचिन्हही देऊन टाकले. खरे म्हणजे शरद पवार गटाने दुसरे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तिन्ही पर्याय रद्द करून निवडणूक आयोगाने तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले.
शरद पवार गटाला चिन्ह मिळताच त्यांनी पक्षचिन्हाचे थेट रायगडावर अनावरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी रायगडावर जंगी कार्यक्रम पार पडला. रायगड किल्ला सर करणे शरद पवार यांच्यासाठी अवघड होते. परंतु रोपवे आणि पालखीच्या मदतीने ते रायगडावर पोहोचले. यावेळी सर्व आमदार, खासदारांसह नेते, पदाधिकान्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सर्वांना फेटे बांधून यावेळी रायगडावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवराय यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुतळ्याला अभिवादन करीत छत्रपती शिवरायांच्या जयघोषात तुतारी फुंकून आगामी लोकसभा निवडणुकीचा हुंकार भरला. यावेळी शरद पवार यांच्या नावाने जयघोष करण्यात आला. एका अर्थाने शरद पवार गटाने थेट किल्ले रायगडावर शिवरायांना साक्षी मानून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शक्तिप्रदर्शन केले आणि आपली पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकत्यांनी मोठी गदीं केली होती
