डॉ संभाजीराजे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश. -उपमुख्यमंत्री अजित पवार,तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – संभाजीनगर येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या संविधान मेळावा संपन्न झाला.या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,महिला अध्यक्षा रूपालिताई चाकणकर,आमदार अमोल मिटकरी,जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, सामाजिक न्याय विभागाचे सुनील मगरे,एरंडोल तालुकाध्यक्ष अमित पाटील,रमेश पाटील,प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थितीत डॉ संभाजीराजे पाटील यांच्यासह पारोळा,एरंडोल,भडगाव,कासोदा सह क्षेत्रातील २६२ सदस्यांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी छत्रपती संभाजीनगरात डॉ संभाजीराजे आलेत हा योगायोग उत्तम आहे,आता तुम्ही घोडदौड सुरू ठेवा आम्ही आपल्या पाठीशी खंबीर उभे आहोत अश्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मेळाव्यास महिलांची प्रचंड उपस्थिती बघून रुपालीताई चाकणकर यांनी विशेष कौतुक केले व लवकरच या सर्व महिला कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पारोळ्यात येणार असल्याचे सांगितले.
पुढील भूमिका लवकरच – डॉ संभाजीराजे
उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या सोबत सातत्याने भेटी झाल्यात, अजित पवार यांचे विकासात्मक धोरण हे मतदारसंघातील शेतकरी उद्योग,विकासासाठी आवश्यक आहेत,त्यामुळेच हा प्रवेश असून पुढील धोरण आणि निर्णय पुढील बैठकीत ठरतील,लवकरच पत्रकार परिषद देखील घेऊ.आज मोठ्या संख्येने प्रवेश केलेल्या सहकार्यांचे आभार मानले.