राज्यात सरकार आहेच कुठे? ड्रग्ज प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात..


24 प्राईम न्यूज 26 Feb 2024.राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो कोटींचे ड्रग्ज आढळले आहे. काही राजकीय मंडळी गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात, तर दुसऱ्या बाजूला सरकारमधील नेते पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. यामुळे राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. काही सत्ताधारी आमदार पोलिसांबाबत काहीही विधाने करतात. हे सरकार बिल्डर, ठेकेदार की सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.