मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने जबाबदारीने बोलावे.. -शरद पवार

24 प्राईम न्यूज 28 Feb 2024. जरांगे-पाटील हे शरद पवारांची स्क्रीप्ट वाचत आहेत, असा आरोपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केला. त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने जबाबदारीने बोलावे, असा सल्लाराष्ट्रवादीचे अध्यक्ष (शरदचंद्र पवार गट) शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, मी मनोज जरांगे यांना केवळ एकदाच भेटलो आहे. जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे त्यांचे उपोषण सुरू झाल्यावर मी त्यांनासर्वात आधी भेटायला गेलो होतो. मी त्या भेटीवेळी त्यांना सांगितलं की, तुमच्या मागण्या मी समजू शकतो. परंतु, हे आंदोलन करत असताना दोन समाजांमधील अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकेल, असे आंदोलन करा. त्यावेळी आम्हा दोघांमध्ये एवढंच संभाषण झालं. त्यानंतर आज अखेर एका शब्दाने आमचं बोलणं नाही की भेट नाही. तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर असा आरोप करणं चुकीचं आहे. प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांनी असं बोलायला नको होतं.
दरम्यान, तुम्हाला चौकशी करायची असेल तर अवश्य करा. त्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक करा, एसआयटी नेमा, तुम्हाला वाट्टेल ते करा आणि चौकशी पूर्ण करा. कर नाही त्याला डर कशाची? आमचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. सत्ताधारी लोक म्हणत आहेत की, फोन केले होते, तसं वाटत असेल तर आमचे फोन तपासा आणि मनोज जररांगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन तपासा. माझ्या फोनवरून एक जरी फोन केल्याचं सिद्ध झालं तर तुम्हाला वाट्टेल ती गोष्ट मी मान्य करेन, असे आवाहन पवार यांनी दिले
